rgjay
Scheme Details :

ध्येये: दारिद्र्य रेशे खालील आणि दारिद्र रेशे वरील (पांढरी शिधा पत्रिका धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व National Insurance Co. Ltd. यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे..

योजना: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ३ वर्षात टप्याटप्याने राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ खालील आठ जिल्ह्यातील कुटुंबांना घेता येईल : गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई,मुंबई उपनगर

फायदे: या योजने अंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया / औषधोपचार व १२१ फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता येईल.
1 GENERAL SURGERY
2 ENT SURGERY
3 OPHTHALMOLOGY SURGERY
4 GYNAECOLOGY AND OBSTETRICS SURGERY
5 ORTHOPEDIC SURGERY AND PROCEDURES
6 SURGICAL GASTRO ENTEROLOGY
7 CARDIAC AND CARDIOTHORACIC SURGERY
8 PEDIATRIC SURGERY
9 GENITOURINARY SYSTEM
10 NEUROSURGERY
11 SURGICAL ONCOLOGY
12 MEDICAL ONCOLOGY
13 RADIATION ONCOLOGY
14 PLASTIC SURGERY
15 BURNS
16 POLY TRAUMA
17 PROSTHESES
18 CRITICAL CARE
19 GENERAL MEDICINE
20 INFECTIOUS DISEASES
21 PEDIATRICS MEDICAL MANAGEMENT
22 CARDIOLOGY
23 NEPHROLOGY
24 NEUROLOGY
25 PULMONOLOGY
26 DERMATOLOGY
27 RHEUMATOLOGY
28 ENDOCRINOLOGY
29 GASTROENTEROLOGY
30 INTERVENTIONAL RADIOLOGY

उपभोक्ता कुटुंब: गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई आणि मुंबई उपनगर. या जिल्ह्यातील खालील अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. १) पिवळी शिधा पत्रिका धारक कुटुंब २) अंत्योदय अन्ना योजना कार्ड ३) अन्नपूर्णा कार्ड ४) नारंगी शिधा पत्रिका धारक कुटुंब पांढरी शिधा पत्रिका धारक कुटुंबांला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासना टार्फे उपभोक्ता कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल

ओळखपत्र: राजीव गांधी योजनेच्या सर्व उपभोक्त्यांना राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल, या ओळख पत्राचे वाटप मुख्यतः महाराष्ट्र सरकारच्या पिवळ्या व नारिंगी शिधा पत्रिकेचा व आधार कार्ड चा पूर्व सूचीनुसार केले जाईल. आधार कार्ड व अनुक्रमान्काचा अनुपास्थिती मध्ये व्यक्तीची शिधा पत्रिका व पासपोर्ट चा उपयोग छायाचित्र परिचयासाठी केला जाईल.

 

परिस्थिती

उपाययोजना

उपभोक्त्या जवळ राजीव गांधी आरोग्य ओळख पत्राची अनुपस्थिती आहे पण उपभोक्त्या कडे पिवळी किव्वा नारिंगी शिधा पत्रिका आहे.

रुग्णाच्या तातडीच्या परिस्थितीतील दवाखान्या मधील दाखल्या च्या परिस्थितीमध्ये रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपाची औषधोपचार परवानगी दिली जाईल दवाखान्यामधून डीसचार्ज चा वेळेस रुग्णांनी ओळख पत्र दाखवणे गरजेचे आहे अथवा उपचारासाठी ग्राह्य झालेली रक्कम रद्द होईल.

पिवळ्या व नारिंगी शिधा पत्रिके वर नवजात अर्भकाची नोंद नसणे किव्वा आधार कार्ड ग्राह्य झाल्या नंतर झालेल्या नवजात अर्भकाचा करिता वैद्यकीय सेवेची गरज असणे

नवजात अर्भकाचा छायाचित्रा बरोबर पालकांचा फोटो व शिधा पत्रिका या सोबत अर्भकाचा जन्म दाखला जोडून वैद्यकीय सेवेचा उपभोग घेता येईल.

पूर्व आजार: या योजने अंतर्गत योजनेचा सुरवात तारखे पासून सर्व पूर्व आजारांचा साठी केलेले औषधोपचार यौजाने अंतर्गत असलेल्या नियमांचा कक्षेत ग्राह्य धरले जातील.

योजनेचा कालावधी आणि कुटंब साठी ग्राह्य केलेली रक्कम : योजने अंतर्गत रुग्णालय मध्ये भारती झाल्या नंतर १५०००० रु. पर्यंतचा खर्च प्रत्येक वर्षामध्ये पूर्ण कुटुंबा साठी देण्यात येईल या करिता अधिकृत रुग्णालयामध्ये पैसे न भरता वैद्यकीय सेवा घेता येईल, ह्यासाठी आरोग्य कार्ड किव्वा पिवळी व नारिंगी शिधा पत्रिका दाखवणे गरजेचे आहे. ह्या सेवे अंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पारिवारिक योजने अंतर्गत लाभ गेटा येईल. प्रत्येक कुटुंबा साठी १५०००० रु. एकासाठी किव्वा सगळ्यात मिळून वापरता येईल. तसेच मूत्रपिंडा प्रत्यारोपण साठी २,५०,००० रु. पर्यंत लाभ घेण्यात येईल. हि विमा योजना लागू झाल्या पासून १ वर्षा पर्यंत सर्व उपभोक्त्यांना लाभ घेता येईल.

अतिरिक्त कालावधी : विमा योजने अंतर्गत विमा योजनेचा अतिरिक्त कालावधी योजना संपल्या नंतर एक महिन्या पर्यंत ग्राह्य केला जाईल. या करिता वैद्यकीय सेवेची पूर्व सूचना आणि त्याची मान्यता योजनेच्या कालावधीत देणे गरजेचे आहे.

नियोजित दर : राजीव गांधी योजने अंतर्गत नियोजित वैद्यकीय सेवांचा लाभ पेकेज मध्ये अधिकृत रुग्णालयात सर्व लाभार्थींना घेता येईल. पेकेज अंतर्गत पुढील गोषित वैद्यकीय उपचाराचा समावेश केला गेला आहे : १) राहण्याचा शुल्क (सर्वसाधारण कक्ष) २) परिचारिका शुल्क ३) शल्यविशारद शुल्क ४) भूल तज्ञ ५) वैद्यकीय अधिकारी ६) तपासणी शुल्क ७) भूल, रक्त, ओक्सिजेन, शस्त्रक्रिया कक्ष शुल्क, उपकरणे व औषधे ८) कृत्रिम अवयव रोपण, क्ष किरण आणि रोग निदान चाचणी ९) परिवहन मांडला चा प्रमाणे परिवहन शुल्क (रुग्णालय ते घर) अतिरिक्त शब्दात पेकेज मध्ये रुग्णाचा भारती पासून त्याचा परत घरी पोचवण्या पर्यंत सर्व खर्च या योजने अंतर्गत शुल्कारहित सुविधे अंतर्गत दिला जाईल. सर्व लाभार्थींना आवाहन करण्यात येते कि ठरवलेल्या शस्त्रक्रिया (hernia, vaginal or abdominal hysterectomy, appendectomy, cholecystectomy,discectomy, etc. ) शासकीय रुग्णालयात करण्यात याव्या.

शुल्कारहित वैद्यकीय सुविधा : या योजने अंतर्गत सर्व अधिकृत रुग्णालयामध्ये नियोजित पेकेज अंतर्गत सर्व वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल. रुग्णाला या अधिकृत रुग्णालयांमध्ये काहीही शुल्क न देता नियोजित वैद्यकीय सेवेंचा लाभ गेटा येईल. या सेवेचा लाभ घेण्या करिता कुठल्याही रुग्णालयात भारती होण्या अगोदर रुग्णाने अधिकृत रुग्णालयांची सूची तपासून रुग्णालय अधिकृत असल्याची खातरजमा करून घ्यावी. रूग्णालया मध्ये जागेची कमतरता असल्यास रुग्णाला जवळचा रूग्णालया ची माहिती देऊन शिफारस पत्र आरोग्यामित्रा द्वारे देण्यात येईल.

विम्याची ओनलाइन भरपाई : विम्याची भरपाई खालील कागदपत्राची पूर्तता केल्या वर सात दिवसात विमा कंपनी द्वारे करण्यात येईल. जरुरी कागदपत्रे खालीलप्रमाणे : १) सर्वे मुळ बिल २) तपासणी चाचणी निदान ३) डिसचार्ज पत्रक - वैद्यकीय अधिकार्याने प्रमाणित केलेले. ४) आजाराचा निगडीत इतर गरजेची कागदपत्र ह्या पूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण व तपासणी राजीव आरोग्यदायी सोसायटी तर्फे केली जाईल.

अधिकृत रुग्णालय मध्ये वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्याकरिता खालील सूचनांचा उपयोग करावा

क्रमांक 01: लाभार्थी कुटुंबांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व सेवेतील रुग्णालयीन कर्मचारी व आरोग्य मित्रांच्या सहकार्याने सेवेचा लाभ घ्यावा लाभार्थी ने जर दुसरया रुग्णालयात प्राथमिक सेवा व निदान केला असल्यास शिफारस पत्र मध्ये त्या सर्व निदानांची नमूद करून आणावी. लाभार्थींना चाचणी शिबिरात प्राथमिक निदान करून शिफारस पत्र देण्याची सोय आहे. या सर्व सेवेची माहिती अधिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र कडे उपलब्ध करून दिलेली आहे.

क्रमांक 02: रुग्णाची नोंदणी आरोग्य मित्र द्वारे सर्व कागदपत्रे (शिफारस पत्र / पिवळे आणि नारिंगी शिधा पत्रिका/ आरोग्य कार्ड) पडताळून केली जाईल. आरोग्य मित्र रुग्णाला तज्ञांकडे प्राथमिक सल्ला, प्राथमिक चाचण्या, प्राथमिक निदान व प्राथमिक तपासणी व प्रवेश प्रक्रीये साठी मार्गदर्शन केले जाईल, रुग्णाची प्राथमिक माहिती, त्याचे निदान, ताची वैद्यकीय टिपणी बद्दलचा तपशील आरोग्य मित्राद्वारे संगणकीय माहिती संग्रहात संग्रहित केला जाईल.

क्रमांक 03: अधिकृत रुग्णालय रुग्णाची प्राथमिक तपासणी करून रुग्णाच्या खर्चाचे E-पुर्वामान्यता पत्र विमा कंपनी ला पाठवले जाईल, हे पुर्वामान्यता पत्र राजीव गांधी जीवनदायी आरोग्य सोसायटी द्वारे वेळोवेळी तपासले जाईल.

क्रमांक 04: विमा कंपनी चे अधिकृत वैद्यकीय तज्ञ आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने द्वारे खर्चाचा पूर्वसूचनेची तपासणी केली जाईल, सर्व कागदपत्रे व नियमांची पूर्तता केली असता अधिकृत रक्कम १२ तासांचा आत ग्राह्य केली जाईल. तसेच तातडीचा आरोग्य सेवेच्या पुर्वासुचानेची तपासणी व मान्यता ७ तासाचा आत केली जाईल.

क्रमांक 05: विमा खर्चाच्या पुर्वासुचाने नुसार मान्यता मिळाल्या पूर्व अधिकृत रुग्णालय रुग्णाला शुल्कारहित सेवा ग्राह्य करेल. रुग्णाच्या शस्त्रक्रियेचा नंतर शस्त्रक्रियेची नोंदणी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

क्रमांक 06: रुग्णाचा उपचारानंतर अधिकृत रुग्णालय त्याचे सर्व मुळ बिल, चाचणी निदान, रुग्णाचे परिमाण पत्र, व इतर कागदपत्रे विमा कंपनी ला विम्याच्या भुगतानासाठी देईल. हि सर्व माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येईल

क्रमांक 07: विमा कंपनी सर्व दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करून नियोजित दरपत्रकानुसार पेकेज प्रमाणे मान्यता राशी ग्राह्य करेल, सर्व विम्याची भुगतान राशी संकेत स्थालाद्वारे(electronic transfer) जमा केली जाईल.

क्रमांक 08 :रुग्णाला गरजेचा सर्व निदान चाचण्या अधिकृत रुग्नालायाद्वारे निशुल्क केल्या जातील

प्राथमिक निदान शिबीर : सर्व तालुका कार्यालये, ग्रामपंचायत, महानगरपालिका व नगरपालिका स्तरांवर निदान शिबारांचे आयोजन प्रत्येक आठवड्याला अधिकृत रुग्णालय द्वारे केले जाईल. निदान शिबिरांचे आयोजन विमा कंपनी द्वारे तपासले जाईल. ह्या सर्व निदान शिबिरांची जागा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य यौजना सोसायटी द्वारे ठरविले जाईल. ह्या पूर्ण शिबिराची जबाबदारी MCCO वर असेल व MCCO ह्याबाद्दलाचे निगडीत पत्रव्यवहार रुग्नालायाबरोबर करेल. अधिकृत रुग्णालयाचे कर्मचारी ह्या सर्व शिबिरासाठी लागणारे साहित्य / उपकरणे / परिचारिका वर्गा ची व्यवस्था नियोजित ठिकाणी करेल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी द्वारे सूचित सर्व नियमांचे पालन अधिकृत हॉस्पिटल करेल त्याची वेळोवेळी शाश्वती विमा कंपनी चा अधिकाऱ्यांनी करावी.

ग्राहक सेवा केंद्र : कुठल्याही वेळी आमचा ग्राहक सेवा केंद्राशी सहाय्यते साठी संपर्क साधता येईल. ह्याचाशी निगडीत दूरसंचार क्रमांक खालील प्रमाणे :

सामान्य माहिती : १८००-२३३-११६६

निशुल्क सेवा माहिती :१८००-२३३-४५०५