टोल-फ्री क्रमांक : १५५ ३८८ , १८०० २३३ २२ ००

एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

योजनेविषयी - महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना(पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) 2 जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. सदर महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि.23 सप्टेंबर,2018 पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली. या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित होती. ही योजना 2018 ते 2020 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली.सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा 60:40 च्या प्रमाणात आहे.

वरीलप्रमाणे राबविण्यात येत असलेल्या एकत्रित योजनेत शासनाने दि.26 फेब्रुवारी,2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या. त्यानुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.50 लक्ष रकमेचे विमा संरक्षण पुरविले जात होते. तसेच आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5.00 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण लागू होते. सदर योजना दि.1.04.2020 ते दि.30.06.2024 या कालावधीत राबविण्यात आली.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने दि.28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानुसार दि.1 जुलै 2024 पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे. ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते. ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

एकत्रित योजने ठळक वैशिष्ट्ये:

  • • महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण
  • • अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम रहीत व्दितीय व तृतीय प्रकारचे उपचार
  • • प्रति वर्ष रु. 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात.
  • • रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया/उपचारांच्या वैद्यकीय सेवा
  • • योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत.
  • • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.
  • • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो.
  • • योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जेथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवांबद्दल तक्रार करू शकतात
  • • योजना पूर्णपणे कागदविरहीत व संगणक प्रणालीव्दारे राबविली जाते.
  • • लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्याठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत.
  • • आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे सूचना देऊन रुग्ण उपचार घेऊ शकतात.

विस्तारित योजनेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

लाभार्थी::

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट-अ)
  • सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना, 2011 (SECC) मध्ये नोंदविलेली कुटुंबे
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गटातील (PHH) कुटुंबे
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
    गट लाभार्थ्यांचा तपशील
    गट अपिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे
    गट ब
    • • शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
    • • कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक असलेली कुटुंबे
    गट क
    • • शासकीय/शासनमान्य अनाथाश्रमातील मुले,
    • • शासकीय/शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी,
    • • शासकीय/शासनमान्य महिला आश्रमातील महिला,
    • • शासकीय/शासनमान्य वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक
    • • माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य
    • • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे (महाराष्ट्र राज्यातील बाहेरील रहीवासी असलेले)
    गट ड महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त्‍ झालेला महाराष्ट्र/भारताबाहेरील रुग्ण
    गट इ
    • महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील 865 गावांतील खाली नमूद केलेली शिधापत्रिकाधारक कुटुंबे
    • १) अंत्योदय अन्न योजना (AAY)
    • २)प्राधान्य गट (PHH)
    • ३) अन्नपूर्णा योजना
    पात्रता आणि ओळख
    पप्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट अ)आयुष्मान कार्ड व व वैध फोटो ओळखपत्र
    महात्मा फुले योजना (गट अ)आयुष्मान कार्ड किंवा शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपुर्णा, केशरी) व वैध फोटो ओळखपत्र
    महात्मा फुले योजना (गट ब)
    • • आयुष्मान कार्ड किंवा शुभ्र शिधापत्रिका.
    • • शुभ्र शिधापत्रिका नसल्यास, स्वयं-घोषणापत्रासह अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र
    • • शासकीय/निमशासकीय कर्मचारी असल्यास, स्वयं-घोषणापत्रासह शुभ्र शिधापत्रिका आणि वैध फोटो ओळखपत्र
    महात्मा फुले योजना (गट क) आयुष्मान कार्ड किंवा संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र
    महात्मा फुले योजना (गट ड) अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगींग फोटो, रस्ते अपघात झाल्याचे रुग्णालयाने पोलीसांना कळविल्याचे पत्र तसेच रुग्णाचा आधार कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही फोटो ओळखपत्र
    महात्मा फुले योजना (गट इ) कर्नाटक शासनातील समक्ष प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली अंत्योदय अन्न योजना (AAY) शिधापत्रिका, प्राधान्य गट (PHH) शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका, विहीत नमुन्यातील स्वयं-घोषणापत्र आणि वैध फोटो ओळखपत्र

    लाभार्थी कुटुंबांची संख्या:

    एकत्रित योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 2.72 कोटी कुटुंबे (12.50 कोटी लोकसंख्या) समाविष्ट आहेत.

    वार्षिक आरोग्य कव्हरेज -

    • ¨अ ते इ गट° साठी (ड वगळून) - दोन्ही योजनांसाठी रु. 5 लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष

    •¨ड गट° करिता - रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष.

    वैद्यकीय लाभ -

    • ¨अ ते इ गट° साठी (ड वगळून) - 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार पॅकेज

    •¨ड गट° करिता - रस्ता अपघात रुग्णांसाठी 184 आरोग्य उपचार पॅकेज

    शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार - दोन्ही योजनांसाठी 119 आरोग्य उपचार पॅकेज (¨अ ते इ गट° साठी)

    शस्त्रक्रिया पश्चात पाठपुरावा सेवा - दोन्ही योजनांसाठी 262 आरोग्य उपचार पॅकेज (¨अ ते इ गट° साठी)

    उपचारांचा समावेश: अंगीकृत रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या दरामध्ये सर्वसाधारण वॉर्डमधील खाटाचे शुल्क, परिचारिका शुल्क, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिअटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयवाची किंमत, रक्त संक्रमणाचे दर (राज्य शासनाच्या धोरणानुसार रक्त पुरविणे), इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, राज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या व्दितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतुक खर्च (रुग्णालय ते रुग्णाचे निवासापर्यंत) या खर्चाचा समावेश आहे. पॅकेज दरामध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण खर्चाचा अंतर्भाव असून लाभार्थ्यास सर्व सेवा नि:शुल्क पुरवावयाची आहे. जर रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत घेऊन जाण्याचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

    हमी तत्वावर दावे प्रदान: एकत्रित योजना हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. याचाच अर्थ योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या खर्चापोटीचे अंगीकृत रुग्णालयांमध्ये दावे थेट राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून संबंधित अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेतील गट-अ, ब, क व इ या गटातील लाभार्थ्यांचे प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5 लक्ष रकमेचे व गट-ड मधील रस्ते अपघातग्रस्तांचे रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष रकमेचे दावे संबंधित अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करण्याची कार्यवाही राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून करण्यात येते.